Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्य महामार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करा - आपचे मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

राज्य महामार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करा - आपचे मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

धाराशिव -आम आदमी पार्टी धाराशिव वतीने राज्य महामार्ग परिवहन महामंडळ ( एस . टी ) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना तहसिलदार तुळजापूर यांच्या मार्फत जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके  यांनी दिले .

या निवेदनात असे म्हटले आहे की ,यापुर्वीही सदरील विषया संदर्भातील मागणीचे  निवेदन आप च्या माध्यामातुन श्री . मधुकर शेळके  यांनी दि . १५/०२/२०२३ रोजी  दिले असुन राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची अनेक दिवसाची   मागणी मान्य करावी  त्याच्या  हितासाठी राज्य महामंडळ शासनामध्ये विलीनीकरण करावे  व असंख्य एस .टी  कर्मचार्यांना न्याय द्यावा आपल्या मार्फत योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे .

        महाराष्ट्रामध्ये ज्यावेळीस महविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळेस भाजपचे आमदार मा .गोपीचंद पडळकर व मित्र पक्षाचे आमदार मा . सदाभाऊ खोत यांनी  वरील मागणी पुर्ण करण्या बाबत महायुतीची सत्ता आल्यानंतर  सर्व कर्मचार्यांना आश्वासन दिले होते .सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे तरी मा. मुख्यमंत्री साहेबांनी राज्य महामार्ग परिवहन महामंडळ कर्मचार्यांची अनेक दिवसाची मागणी मान्य करून राज्य महामार्ग परिवहन  महामंडळ राज्य शासनामध्ये  विलीनीकरण करावे अशी मागणी सदरील निवेदनात केली आहे . या निवेदनाची प्रत मा . विरोधी पक्षनेते महाराष्ट्र व अप्पर मुख्य सचीव साहेब यांना माहितीस्तव पाठवीली आहे.

Post a Comment

0 Comments