Hot Posts

6/recent/ticker-posts

अभय ग्रुप कडून नागठाण्यात खो-खो स्पर्धांचे यशस्वी नियोजन

अभय ग्रुप कडून नागठाण्यात खो-खो स्पर्धांचे यशस्वी नियोजन


सातरा: खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना क्रीडा क्षेत्रातील व्यासपीठ तयार व्हावे म्हणून अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ  नागठाणे यांच्यावतीने २९ ऑगस्ट क्रीडा दिनाचे औचित्य साधून १ सप्टेंबर २०२४ रोजी खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील अनेक खो-खो संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस  भरतगाव क्रीडा क्लब भरतगाव या संघाने पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस विघ्नहर्ता स्पोर्ट क्लब अपशिंगे या संघाने पटकावले व तृतीय क्रमांकाचे बक्षीस विघ्नहर्ता खो-खो क्लब बोरगाव या संघाने प पटकावले.

खेळाडूंचा जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धांचा सराव व्हावा खेळाडूंना जय पराजय पचवणे या गोष्टी शिकायला मिळाव्यात या उद्देशाने अभय ग्रुप नागठाणे यांनी ही स्पर्धा भरवली होती या स्पर्धेमुळे नागठाणे पंचक्रोशीतील क्रीडापटूंना व्यासपीठ तयार झाले या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन छत्रपती शिवाजी विद्यालय अपशिंगे या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.एल.आर पवार  (सर)तसेच श्री रामकृष्ण विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. जे.एम.कांबळे (सर) यांनी केले , तर पंच म्हणून कामगिरी कोच अनुराग लोहार व कोच साहिल गुजर तसेंच कोच राज देशमुख यांनी पार पाडली.

स्पर्धेच्या उद्घाटनासाठी रुद्राक्ष उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विजय पवार, नागठाणे ग्रामपंचायत सदस्य श्री किरण साळुंखे, केंद्र शाळा नागठाणे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री संदीप साळुंखे, प्राध्यापक श्री किशोर साळुंखे मंडळाचे सचिव श्री तुकाराम निकम व मंडळाचे सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments