Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा

चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी  व परिसरात बैलपोळ सण दि,२रोजी  उत्साहात साजरा करण्यात आला. सध्या शेतकरी बैलापेक्षा यांत्रिक अवजारे शेती कामासाठी वापरत असल्याने शेतकर्‍यांकडे बैलांची संख्या कमी आहे. परंतु, ज्या शेतकर्‍याकडे बैल आहेत, त्यांनी बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढून बैलपोळा साजरा केला.

वर्षभर शेतात शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी अपार कष्ट करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा मिञ बैल यांना बैलपोळ्याच्या दिवशी गळ्यांत चंगाळी शिंगाना कलर अंगावर कलरने विविध प्रकारची सजावट अंगावर झुली या पध्दतीने पोळ्यानिमित्त सजवुन बैलांची गावातून शेतकऱ्यांकडुन मिरवणुका काढण्यात आल्या. घरात पुरण पोळीचा स्वयपाक करुन बैलाची पुजा करुन बैलाना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली. वर्षभर शेतातील विविध कामात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा बैलपोळ्याचा सण साजरा करण्यात येतो.यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने ;खरीप हंगामातील प्रमुख पिके बहरली आहेत .यंदा बैलपोळ्याच्या आधल्या दिवशी पासूनच वरून राजाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांचा आवडता व महत्त्वाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.



Post a Comment

0 Comments