जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीची तत्काळ पंचनामे करा शेतकर्यांना त्वरीत मदत करा---आपचे मधुकर शेळके यांची मागणी
-धाराशिव - मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांचे मोठे नुकसान झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागातील तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी धाराशिव वतीने श्री . मधुकर शेळके जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी धाराशिव यांना तहसिलदार तुळजापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले .
सदरील निवेदनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुक्यात मागील दोन -तीन दिवसापूर्वी अतिवृष्टी झालेली आहे . त्यामुळे शेतीचे ,पिकाचे व इतर शेती पूरक साधनांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे.अतिवृष्टीमुळे शेतात सर्वत्र पाणी झाले आहे हातची पिके गेलीआहेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त भागातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे व त्यांना आर्थिक सहकार्य मदत करण्यात यावी .तरी संबंधीत यंत्रनेमार्फत त्वरीत पंचनामे करण्यासंदर्भात योग्य कार्यवाही करण्यात यावी बाबतचे निवेदन श्री . मधुकर शेळके यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार तुळजापूर यांच्या मार्फत आज देण्यात आले .यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते .
0 Comments