Hot Posts

6/recent/ticker-posts

मातोश्री कारखान्याने ऊस बिल नाही दिल्याने उमरगा लोहारा शेतकऱ्यांचे सोलापूर येथे ठिय्या आंदोलन.... सातलिंग स्वामी यांची मध्यस्थी फलदायी

मातोश्री कारखान्याने ऊस बिल नाही दिल्याने उमरगा लोहारा शेतकऱ्यांचे सोलापूर येथे ठिय्या आंदोलन.... सातलिंग स्वामी यांची मध्यस्थी फलदायी


धाराशिव -  अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री शुगर लिमिटेड रुद्देवाडी  जि. सोलापूर येथील साखर कारखान्यास तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस घातला होता. ऊस घालून तब्बल नऊ महिने उलटूनही संबंधित कारखान्याने ऊस बिलापोटी अद्याप एक छदामही शेतकऱ्यांना दिलेला नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर येथे काँग्रेस भवन कार्यालयासमोर दिनांक 4 सप्टेंबर 2024 पासून ठिय्या आंदोलन चालू केले आहे. हे समजताच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ( कॅबीनेटमंत्री दर्जा ) ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा सामाजिक कार्यकर्ते व उमरगा लोहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले उमरगा लोहारा मतदारसंघातील रहिवाशी असलेले तगडे उमेदवार सातलिंग स्वामी यांनी सदर आंदोलन स्थळी शेतकऱ्यांची भेट घेऊन संबंधित कारखान्याचे चेअरमन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी मातोश्री शुगर कारखान्याचे चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले दिनांक सहा सप्टेंबर पर्यंत बँक खात्यात जमा केली जातील असे आश्वासन देऊन ठिय्या आंदोलन संपवावे अशी विनंती केली. मात्र संतापलेल्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत खात्यावर पैसे पडत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. सदर आंदोलनात उमरगा लोहारा व तुळजापूर तालुक्यातील तब्बल अडीचशे ते तीनशे शेतकरी सहभागी झाले होते.

याप्रसंगी शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून मानसिक आधार देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार, संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments