धाराशिव :लोहारा तालुक्यातील एका गावात 25 वर्षीय तरुणाने बारा वर्षाच्या शाळकरी मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलाने लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी दिनांक 30 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील एका गावात बारा वर्षाचा मुलगा आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या वर्गात तो शिक्षण घेत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर चालतो त्यामुळे रविवारी सकाळी घरातील आजी वगळता सर्वजण सोयाबीन काढण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरीने गेली होती. शाळेला सुट्टी असल्याने मुलगा दिवसभर घरी होता दुपारी चारच्या सुमारास पीडित मुलगा व त्याचा मित्र दोघे मिळून घराजवळ असलेल्या शेतात शौचासाठी गेले होते. परत येताना गावातीलच 25 वर्षाच्या तरुणाने पीडित मुलाच्या मित्राला दगड मारून हाकलून दिले त्यानंतर अल्पवयीन मुलाच्या हाताला धरून तुरीच्या पिकात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्रास होत असल्याने पीडित मुलाने मजुरी करून आलेल्या आई-वडिलांना रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला . कुटुंबीयसह पीडित मुलाने संबंधित पोलीस ठाण्यास तात्काळ धाव घेतली. पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणा विरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार करत आहेत.
0 Comments