नळदुर्ग सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी शिवारात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
तुळजापूर : भरधाव ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका दुचाकी स्वराचा जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दिनांक 13 रोजी नळदृग सोलापूर रोड राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी शिवारात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेमा वालु राठोड वय (65) वर्ष राहणार फुलवाडी तांडा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या मोटरसायकल क्रमांकMh-35-at-2216 वरून जात होते. यावेळी फुलवाडी पाटील जवळ अशोक लेलँड ट्रक क्रमांक KA-56-3568 चालक आरोपी शरणप्पा शंककोळे ( राहणार मंटाळ बसवकल्याण) यांनी ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून राठोड यांना पाठीमागून जोराची धडक दिली यात गंभीर जखमी गेमा वाळू राठोड यांचा मृत्यू झाला याबाबत तुकाराम राठोड यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments