Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्या विधानसभा प्रचाराच्या तोफा थंडावणार , अवघ्या तीन दिवसावर मतदान सहाव्या दिवशी होणार मतमोजणी

उद्या विधानसभा प्रचाराच्या तोफा थंडावणार , अवघ्या तीन दिवसावर मतदान सहाव्या दिवशी होणार मतमोजणी


धाराशिव/ राजगुरू साखरे : विधानसभेचे सर्वत्र वातावरण चांगलेच तापले असून जिकडे तिकडे राजकीय रणधुमाळी सुरू आहे या मतदानाचा प्रचार तोफा उद्या दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत.तर मतदानासाठी आता फक्त तीन दिवस उरले असून सहाव्या दिवशी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे या मतदारसंघातील उमेदवाराकडून आपापल्या मतदारसंघात प्रचार करण्यात येत आहे. जाहीर सभा कॉर्नर मीटिंग ग्रहभेटी प्रचार रॅलीसह सोशल मीडिया वरून उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. प्रचारासाठी अल्प वेळ शिल्लक राहिल्यामुळे उमेदवारांची आता चांगलीच दमछाक होत असून कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता नियोजन केली जात आहे. दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचता येणार असल्यामुळे कमी चेंडू मध्ये जास्त रण करण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करताना दिसून येत आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराकडून आता काही नाराजी पुढारी कार्यकर्ते व मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी आश्वासनाची खैरात वाटली जात आहे अनेक आजी-माजी आमदार कडून गावपुढाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका दुग्ध संघ जिल्हा बँक विकास सोसायटी असं विविध संस्थांमध्ये स्थान दिले जाईल अशी आश्वासने दिली जात आहेत.

मतदानापूर्वी तीन दिवसाच्या सुट्ट्यांचा वीकेंड उमेदवारांना मिळत आहे आज रविवार असल्यामुळे जास्तीत जास्त उमेदवाराकडून नागरिकांच्या  गाठी-भेटी, कॉर्नर सभा ,प्रचंड दिसून आल्या. या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती यश मिळणार आहे दिनांक 23 शनिवार रोजी मतदान मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या परड्यात जास्तीत जास्त मते कशी पडतील याकरिता प्रत्येक उमेदवार धावपळ करत असून उमेदवारासोबत पदाधिकारी कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबातील लोक देखील रात्रीची पहाट करताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments