तुळजापूर शहरात अनेक दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा संबंधित दोषीवर तात्काळ कारवाई करा - आपचे मधुकर शेळके यांची मागणी
तुळजापूर - आम आदमी पार्टी तुळजापूरच्या वतीने मागील अनेक दिवसापासून तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात नगरपरिषदाच्या माध्यमातून दूषित पाणीपुरवठा होत आहे त्याबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन प्रत्यक्ष भेटून नगरपरिषद मुख्याधिकारी यांना सूचना देऊन पण दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात केले जात आहे . सणासुदीच्या कालावधीमध्ये पण मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा शहरात केला गेला आहे दूषित पाणी पिल्यामुळे शहरात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यात लहान मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे .
प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेतरी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री .मधुकर भैय्या शेळके यांनी जर येणाऱ्या येत्या काही दिवसात नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेचे मुख्य प्रशासक मुख्याधिकारी यांनी दूषित पाणीपुरवठ्याचा योग्य बंदोबस्त करावा व शहरवासीयांना शुद्ध पाणी पिण्यास उपलब्ध करून दयावे कारण तुळजापूर शहरातील नागरिक नगररिषद प्रशासनला मालमत्ता कर व नळपट्टी भरतात त्यामुळे त्यांना शुद्ध पिण्यायोग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे न .प प्रशासनाची जिम्मेदारी आहे तरी याबाबतीत न .प मुख्याधिकारी गंभीर नाहीत .
निवेदन सुचना देऊ नही सर्रास शहरवासियांना दुषित पाणी पुरवठा केला जात आहे हि बाब अत्यंत गंभीर आहे सर्वस्वी न . प मुख्याधिकारी जिम्मेदार आहेत त्यांचे तत्काळ निलंबन करावे व चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा . यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी स्वत लक्ष देऊन संबंधीतावर योग्य चौकशी करून कार्यवाही करावी कारण वारंवार निवेदन बातम्या देऊनही दूषित पाणीपुरवठ्याची प्रमाण शहरात बंद होत नाही शहरवासीयांना दुषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो तसेच इतर गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना पण दूषित पाणीपुरवठा पिऊन त्यांच्यामध्ये पण आजारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे .
तरी येणाऱ्या काही दिवसात यावर जिल्हाधिकारी साहेबांनी यावर नियंत्रण आणावे व दूषित पाणीपुरवठ्याचे प्रमाण शहरात बंद करावे त्या दृष्टिकोनातून यंत्रणा कार्यरत करण्यात यावी व तत्काळ संबंधित जिम्मेदार मुख्याधिकारी यांचे निलंबन करावे व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज आम आदित पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तसा सामाजिक कार्यकर्ते मधुकर भैया शेळके यांनी माध्यमांना दिलेली आहे
0 Comments