लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या तिघांचे रॅकेट सापडले, बनावट लग्न लावून करायचे फसवणुक एमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी
छत्रपती संभाजीनगर: लग्नाला मुली मिळत नसल्याचा फायदा घेत बनावट लग्न लावून एका तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कुंडलिक शाहू चव्हाण वय 54 राहणार कमळापूर तालुका गंगापूर, संगीता कुंडलिक चव्हाण वय 42 राहणार छावणी छत्रपती संभाजीनगर, कल्पना प्रकाश मोराळकर राहणार कमळापूर तालुका गंगापूर असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हरिश्चंद्र कुबेर या तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने त्याने नातेवाईक व मध्यस्थ मार्फत मुलीचा शोध सुरू केला होता यावेळी मुलगी मिळत नसल्याने त्यांनी मध्ये त्याच्या मदतीने कुंडलिक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून एक मुलगी असल्याचे हरिश्चंद्र ला सांगितले यावेळी मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर लग्न लावणाऱ्या टोळीने हरिश्चंद्र यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन जालना जिल्ह्यात कुसुम नावाच्या तरुण सोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर एका आठवड्यातच कुसुमने चुलत भावाचा मृत्यू झाल्याचे कारण सांगून घरातून निघून गेली बरेच दिवस झाले पत्नी कुसुम परत आली नाही त्यामुळे हरिश्चंद्र ने लग्न लावणारे मध्यस्थीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले या प्रकरणी हरिश्चंद्र कुबेर यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे व निरीक्षक प्रवीण पाथरकर दिनेश बन अमलदार विनोद नितनवरे जालिंदर रंधे जयश्री मस्के जयश्री फुके विशाल पाटील यशवंत गोवाडे सुरेश कचे नितीन इनामे समाधान पाटील नितीन इनामी मनमोहन कोलीमी गणेश सागरे आधीच्या पथकाने कुंडलिक चव्हाण संगीता चव्हाण कल्पना मावळकर यां तिघांना ताब्यात घेतले आहे.
अनेक तरुणांना या टोळीने घातला गंडा
पोलिसांनी या तिघा आरोपीची चौकशी केली असता त्यांनी लग्न जुळत नसलेल्या तरुणांना लग्न लावून देण्याची आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याची पोलीस तपासात उघडकीस आले आहे त्यांनी सातारा जिल्ह्यातील नानासाहेब बांदल विनोद वाघ यश युवराज बांदल गुजरात मधील विपुल पाटील या चार तरुणासह सिल्लोड वैजापूर नेवासा अहमदनगर मालेगाव धुळे जळगाव मध्ये ठिकाणच्या तरुणाची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे या टोळीकडून बनावट लग्नाची आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी वर्तवली आहे.
0 Comments