Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर जोशी यांच्यासमोर झाली सुनावणी

न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर जोशी यांच्यासमोर झाली सुनावणी


सातारा: संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या न्यायाधीश निकम यांचा अटकपूर्व जामीन शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.आर जोशी यांनी फेटाळला  अंतिरीम जामीन बरोबर अटकपूर्व जामीन हे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्याने न्यायधीश निकम यांच्या पुढील अडचणी वाढले आहेत.

जिल्हा न्यायालयातील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम आनंद खरात,किशोर खरात व अनोळखी एकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वे गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवस उलटल्यानंतरही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. याचा तपास पुणे एसीबी चे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके करत आहेत.

दरम्यान गुरुवारी न्यायाधीश धनंजय निकम यांच्या वतीने एडवोकेट ताहेर मनेर यांनी जिल्हा न्यायालय तात्पुरते अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता . शुक्रवारी बचाव पक्षाच्या वतीने याबाबत व्यक्तिवाद करण्यात आला त्यानुसार सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी व्यक्तिवाद करताना काही खटल्याचा दाखला दिला याचबरोबर न्यायाधीश निकम यांची आणि इतर दोन आरोपींचे सहा महिन्यापासून जवळपास नऊ तास संभाषण झाले आहे. त्यांचा फोन खटल्या कामी जप्त करणे गरजेचे आहे.

तसेच निकम खटल्यातील इतर लोकांचे कॉल डिटेल्स चेक करणे निकम यांचे आवाजाची शहानिशा करणे याचबरोबर इतर तपासासाठी निकम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची जोरदार मागणी केली. पुढे ते म्हणाले सक्रत दर्शनी न्यायाधीश निकम यांचा या गुन्ह्यात सहभाग दिसून येत आहे त्यांचा जर जामीन झाला तर त्यांच्या पदाचे विपरीत परिणाम तक्रारदारासह साक्षीदारावर होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना जामीन मिळाल्यास तपासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो आणि याच बाबीमुळे समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल त्यामुळे न्यायाधीश धनंजय निकम यांचा जामीन फेटाळण्यात यावा असा स्पष्ट युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी केला. याच दरम्यान पुणे एसीबीच्या वतीने म्हणणे सादर करण्यात आले दोन्ही बाजूचा वित्तवाद ऐकल्यानंतर पिल्लू शुक्रवार दिनांक 13 रोजी प्रमुख व सत्र न्यायमूर्ती वी आर जोशी यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळ आहे आता यापुढे अटकेची कारवाई उच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments