Hot Posts

6/recent/ticker-posts

पवन ऊर्जा प्रकल्प : शेतकऱ्यांनी अडचणीसंदर्भात संनियंत्रण; समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

 ♦️पवन ऊर्जा प्रकल्प : शेतकऱ्यांनी अडचणीसंदर्भात संनियंत्रण; समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन


धाराशिव, दि.२६ : राज्य शासनाच्या उदयोग,ऊर्जा व कामगार विभागाच्या ३१ ऑक्टोंबर २०१३ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीस चालना देण्यासाठी तसेच शासनाचे विविध विभाग,जमीन मालक / शेतकरी व प्रकल्प विकास / प्रकल्पधारक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली " पवन ऊर्जा प्रकल्प- जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती " आणि महसूल उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पवन ऊर्जा प्रकल्प उपविभाग स्तरीय समन्वय समिती स्थापन केली आहे.शेतकऱ्यांचे पवन ऊर्जा प्रकल्पासंदर्भातील असणारे विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथील सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. 

पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे असून पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनियमितता तपासणे,पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडित असलेल्या जमीन व्यवहारांमध्ये योग्य व व्यावहारिक मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे,पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने उदभवणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे अशी आहे.

पवन ऊर्जा प्रकल्प - जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची धाराशिव जिल्हयातील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत,त्या शेतकऱ्यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती अर्ज सादर करावेत.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments