शेताच्या रस्त्याच्या वादातून पुतण्याने केला चुलती व भावाचा खुन बार्शी तालुक्यातील घटना
बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भोयरे येथे शेत रस्त्याच्या वादावरून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तालुक्यातील भोयरे येथे शेत जमिनीच्या व रस्त्याच्या वादाच्या कारणावरून पुतण्याने घरातील तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या जीवघेणा हल्ल्यात मायलेक ठार झाले आहेत, तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्यांच्या उपचार सुरू आहे. ही घटना दि. २३ डिसेंबर रोजी सांयकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शेत जमिनीच्या व रस्त्याच्या वादातून भावकीतील पुतण्याने चुलता ,चुलती, आणि चुलत भावावर हल्ला केला. काकी अन् चुलत भाऊ ठार झाल्याने बार्शी तालुक्यासह संबंध सोलापूर जिल्हा हादरला आहे. सागर किसन पाटील (वय २६), सिंधू किसन पाटील (वय ४५) असे खून झालेल्यांची नावे आहेत तर किसन गोवर्धन पाटील (वय ५५, रा. भोसरे) हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतलं आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी भोयरे ता. बार्शी जिल्हा सोलापूर येथे पाटील कुटुंबात शेतीच्या बांधाच्या व पाऊलवाटेच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. २३ डिसेंबर रोजी वाद इतका विकोपाला गेला की ,एकेदिवशी बांधावरून बैलगाडी नेत असताना पुतणे सौदागर पाटील यांनी बैलगाडी अडवली व किसन पाटील, सिंधू पाटील व सागर पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच संबंधित आरोपीने सागर पाटील आणि सिंधू पाटील यांच्या पोटात चाकू खुपसले. यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्याने त्याच धारदार चाकूने किसन पाटील यांच्या बरगडीत, कमरेच्या खाली वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले आहे.
या प्रकरणी नानासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ,सौदागर पाटील, सोनाली सौदागर पाटील आणि निर्मला पाटील (रा. भोयरे, ता. बार्शी) यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दुहेरी खून घटनेने जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
0 Comments