Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ हल्ल्यात वासरू ठार, नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तुळजापूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ हल्ल्यात वासरू ठार, नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


तुळजापूर : मागील पंधरा दिवसापासून जिल्हाभर धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने आता तुळजापूर तालुक्यात मार्गक्रम वळवला असून, तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील शेतकऱ्याच्या गाईच्या वासरावर बिबट्याने सोमवारी (दि.२३) रोजी मध्यरात्री हल्ला केला, यामध्ये दोन वर्षाचे गाईचे वासरू ठार झाले असून, बिबट्याच्या दहशतीने परिसरातील नागरिक शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धाराशिव जिल्ह्यात बिबट्याने सध्या धुमाकूळ घातले असून, सोमवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाईचे वासरू बिबट्याने ठार केले. या दुर्घटनेमुळे शेतकरी मजुरांसह पशुपालक भयभीत झाली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील कामठा शिवारात शेतकरी लक्ष्मण दादाराव साळुंखे यांची शेती आहे त्यांच्या गोठ्याच्या शेजारी कामठा येथील फॉरेस्ट जवळ आहे. गोट्यामध्ये दोन वर्षाच्या गाईची वासरू बांधली होते झाडीतून येऊन बिबट्याने वासराला ठार केले असावे, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून केले आहे. या बाबत तुळजापूर तालुक्याचे वनरक्षक विनोद पाटील आणि मधुकर घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचनामा केल्या नंतर तो बिबट्या असल्याची खात्री झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने योग्य ती खबरदारी म्हणून घाबरून न जाता आम्ही नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

बिबट्या संध्याकाळी-रात्रीच्या वेळी शिकारीसाठी सर्वात जास्त सक्रिय असतो विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी ते दृष्टी बनवतात. नागरिकांच्या-शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. जंगल (फॉरेस्ट) मोठे असल्याने सध्या तरी त्याचा वावर सांगणे अवघड आहे, खात्रीलायक अंदाज लागल्यास योग्य ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पिंजरा लावला जाईल. अशी माहिती विनोद पाटील यांनी बोलताना दिली आहे.

Post a Comment

0 Comments