लाडकी बहीण चे डिसेंबर महिन्यातील पैसे जमा होण्यास सुरुवात-
धाराशिव : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील पैसे वितरण होण्यास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हप्ता मिळणार की नाही याबाबत अफवा पसरत होत्या महिलांनाही हप्ता कधी मिळेल याची उत्सुकता होती अखेर मंगळवारी दिनांक 24 रोजी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाली आहेत दोन महिन्यांचे एकाच वेळी पैसे जमा होतील असे सांगण्यात येत होते परंतु केवळ डिसेंबर महिन्यातीलच पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे पुढील काही दिवसांमध्ये सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. मंगळवारपासून महिलांना पैसे जमा होत असल्याची संदेश येत असल्याचे जिल्ह्यातून माहिती मिळाली आहे .डिसेंबर महिन्यात तील पैसे लाभार्थ्यांना वर्ग करण्यास सुरुवात झाले हे सर्व पात्र महिलांना काही दिवसात पैसे मिळतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत.
0 Comments