Hot Posts

6/recent/ticker-posts

ॲग्रीस्ट्रॅक योजनेसाठी शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांचे आवाहन -Agreestrak Farmer Scheme register

ॲग्रीस्ट्रॅक योजनेसाठी शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ.  सचिन ओम्बासे  यांचे आवाहन -


धाराशिव: केंद्र शासनाचा ॲग्री स्टिक हा एक महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम आहे यामध्ये शेतकरी माहिती संच तयार केला जात आहे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी देण्यात येत आहे. या विशिष्ट ओळख क्रमांकाच्या आधारे भविष्यात कृषीविषयक सर्व व्यवहार व योजना पार पडणार आहेत यासाठी सदर ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनमान्य पोर्टलवर 15 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी अशी आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

पोर्टलवर नोंदणीसाठी ॲग्री स्टॅग या ॲपवर जाऊन शेतकरी स्वतः सेल्फ मोड मधून नोंद करू शकतात तसेच सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी करता येते यासाठी गावनिहा शिबिरे घेण्याच्या सूचना ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी व कृषी सहाय्यक यांना देण्यात आल्या आहेत.ही नोंदणी 15 फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे पिक विमा ,अनुदान हे फार्मर आयडी मार्फत देण्यात येणार आहे .तसेच पीएम किसान ची हप्ते याच माध्यमातून देण्याचे नियोजित आहे यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी व कृषी सहाय्यक अथवा सीएससी केंद्र सरकारकडे संपर्क साधावा असे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments