अपिलाचा निकाल निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 55 हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात-
सोलापूर : मंडळ अधिकाऱ्याने दिलेल्या निकालावरील अपिलाचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर प्रांत अधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक आणि शिपाई अशा दोघांना सोलापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते राहणार विसावा मंदिराजवळ वाखरी व शिपाई नितीन शिवाजी मेटकरी राहणार गणपती नगर पंढरपूर अशी कारवाई झालेल्या दोघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तिसंगी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या अनुषंगाने चतुर सीमा चा वाद होता सांगली येथे राहत असलेल्या यातील एक मूळ मालक होता दरम्यान शिपाई नितीन मेटकरी यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून अपिलाचा निकाल त्याच्या बाजूने लावून देण्यासाठी स्वतः आणि महसूल सहाय्यक किशोर मोहिते याच्यासाठी 60000 रुपये लाचेची मागणी केली .तडजोडीअंती 55 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केली याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली त्यानुसार दिनांक 13 दिनांक 15 व 17 जानेवारी रोजी पडपडताळणी करण्यात आली पोलीस निरीक्षक गणेश पंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आठ दिवसापासून देत होते गुंगारा
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कारवाईसाठी गेल्या आठ दिवसापासून प्रयत्नशील होते मात्र संशयित आरोपी सातत्याने गुंगारा देत होते सोमवारी सायंकाळी त्यांनी तक्रारदाराला पैसे घेऊन प्रांत अधिकारी कार्यालयात बोलावून घेतले शिपाई नितीन मेटकरी यांनी कार्यालयातच 55 हजार रुपये मोजून घेतले.
0 Comments