Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित 'आदर्श प्रीमियर लीग 2025' चषक व इतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित 'आदर्श प्रीमियर लीग 2025' चषक व इतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न 


धाराशिव : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'आदर्श प्रीमियर लीग 2025' चा दिनांक 28 जानेवारी रोजी चषक आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. संस्थेचे सीईओ श्री. आदित्य भैया पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या क्रिकेट लीगच्या चौथ्या पर्वातील सामने नुकतेच पार पडले. यामध्ये पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पुणेरी पलटण विरुद्ध कोल्हापुरी वस्ताद यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापुरी वस्ताद विजयी झाले होते. सोबतच महिलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये नूतन विद्यालयाचा 'शिवनेरी' विरुद्ध फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूल व इंजिनिअरिंगचा 'तोरणा' यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात 'शिवनेरी' संघ विजयी झाला. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात पुरुष क्रिकेटमध्ये मालिकावीर म्हणून विजय उंबरे, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून दयानंद कांबळे, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून विनोद शिरसाट, डबल हॅट्रिक साठी शंकर गोरे यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तर महिला क्रिकेटमध्ये मालिकावीर म्हणून सौ. मंजुळाताई आदित्य पाटील, सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून अफरीन पटेल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून जगताप मॅडम, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून राबिया मॅडम आदींना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. 


     सोबतच संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या रस्सीखेच,  थ्रो बॉल स्पर्धेतील देखील बक्षिस वितरण झाले. नूतन विद्यालय विरुद्ध फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूल व इंजिनिअरिंग यांच्यात झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत नूतन विद्यालयाचा संघ विजयी झाला तर के. टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी विरुद्ध फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूल व इंजिनिअरिंग यांच्यात झालेल्या थ्रो बॉल स्पर्धेत फार्मसी कॉलेजचा संघ विजयी झाला. विजय संघांना, खेळाडूंना संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील सर यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. 


      कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य कै. के. टी. पाटील सर व कै. भागीरथी ताई पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर यांनी केले. प्रास्ताविकात श्री. आदित्य पाटील सर यांनी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी संपर्क यावा, परिचय व्हावा या हेतूने आदर्श प्रीमियर लीग भरवले जाते असे सांगितले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर लाभले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष माननीय श्री. सुधीर अण्णा पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेतील विविध पदाधिकारी, वेगवेगळ्या शाखांचे प्रमुख, प्राचार्य, पर्यवेक्षक आदींची विशेष उपस्थिती लाभली. संगीत शिक्षक श्री. महेश पाटील सर तसेच इतर काही शिक्षकांनी वेगवेगळ्या गीतांचे गायन करून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली. सर्व कार्यक्रमांसाठी व स्पर्धांसाठी परिश्रम घेणाऱ्या सेवक वर्गाचा देखील श्री. सुधीर अण्णा पाटील सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. डी. व्ही. जाधव तर आभार प्राचार्य श्री. नन्नवरे सर यांनी मानले.

      या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. एस.एस. देशमुख सर, संचालक श्री. संतोष कुलकर्णी सर, हातलाई शुगरचे चेअरमन व युवा उद्योजक श्री. अभिराम पाटील सर, फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी सौ. मंजुळाताई आदित्य पाटील, उपमुख्याध्यापक श्री. प्रमोद कदम सर, 'कला, वाणिज्य व विज्ञान' शाखेचे पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर या सर्वांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments