Hot Posts

6/recent/ticker-posts

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याला नव्या कोऱ्या २५ बसेसची भेट

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याला नव्या कोऱ्या २५ बसेसची भेट


मुंबई,पुणे,कोल्हापूर,हैदराबाद,संभाजीनगर धुळे,नाशिक या ठिकाणी धावणार बसेस

धाराशिव, दि.२९:  राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्याला नवीन २५ कोऱ्या बसेस मिळाल्या आहे.त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नव्या कोऱ्या २५ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.या बसेसच्या समावेशामुळे प्रवाशांना अधिक चांगली,आरामदायी आणि सुरक्षित वाहतूक सेवा मिळणार आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रवासासाठी एस.टी.बसेस हाच मुख्य पर्याय आहे.गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जुन्या बसेस बंद पडल्या होत्या.त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.नव्या बसेस आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर तर होणार आहेच सोबत वाहतूक सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

या सर्व २५ बसेस बीएस -६ अत्याधुनिक सोयींनी युक्त असून ह्या बसेस अशोक लेलँड कंपनीच्या आहेत.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुलभ व आरामदायी आसने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. इंधन कार्यक्षमतेवर भर देऊन या बसेस पर्यावरणपूरक बनवण्यात आल्या आहेत.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव आगाराला प्राप्त झालेल्या  बसेसचे योग्य नियोजन करण्यात आले असून,त्या मुख्यतः मोठया शहरांकडे धावणार आहेत.धाराशिव आगारासाठी १० बसेस देण्यात आल्या आहेत.धाराशिव ते मुंबई वेळ सकाळी ७ वाजता,धाराशिव - बोरिवली वेळ सकाळी ९ वाजता, धाराशिव -हैदराबाद वेळ सकाळी ७.३० वाजता दोन बसेस,धाराशिव ते पुणे वेळ सकाळी ६ वाजता,सकाळी ८ वाजता आणि दुपारी २ वाजता, धाराशिव -कोल्हापूर सकाळी ६ वाजता सुटणार आहे

तुळजापुर आगारासाठी १० बसेस देण्यात आल्या आहेत.तुळजापुर ते संभाजीनगर सकाळी ५.३० वाजता, सकाळी १०.३० वाजता, तुळजापूर-सोलापूर-पुणे सकाळी ७.३० वाजता व सकाळी ११.३० वाजता, तुळजापूर -धुळे सकाळी ८.३० वाजता व सायंकाळी ६ वाजता,तुळजापूर- नाशिक सकाळी ६ वाजता व सकाळी ८.३० वाजता आणि कळंब आगारासाठी ०५ बसेस देण्यात आल्या आहेत.कळंब ते बोरीवली वेळ दुपारी ४.३० वाजता, कळंब- बार्शी - पुणे सकाळी ८.३० वाजता आणि ९ वाजता,कळंब- छत्रपती संभाजीनगर सकाळी ६.३० वाजता ह्या बसेस चालवण्यात येणार आहेत.त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्ह्याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून नव्या बसेस मिळाल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अनेक प्रवासी गेल्या काही महिन्यांपासून अधिक बसेसची मागणी करत होते.आता या नव्या बसेस आल्याने प्रवास अधिक सुलभ व लवकर होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments