Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलुज : रणजीत कागदे यांना पीएच.डी.प्रदान

 अकलुज : रणजीत कागदे यांना पीएच.डी.प्रधान

प्रतिनिधी: संजय निंबाळकर


अकलूज/प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रणजीत भारत कागदे यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

दसूर येथील रणजीत कागदे हे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. त्यांनी वेलटेक युनिव्हर्सिटी चेन्नई येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम विथ रिस्क लेव्हल इव्हॅल्युएशन इन वायरलेस सेन्सर नेटवर्क युजींग ऑप्टिमायझेशन असिस्टेड डिप लर्निंग मेथडस् या विषयामध्ये पीएच.डी पूर्ण केली. यामध्ये त्यांना प्राध्यापक आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.एन विजयराज यांनी मार्गदर्शन केले. कागदे यांनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला. त्यांचे पाच शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसूर, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने महाविद्यालय अकलूज, पदवी शिक्षण बी.ई. (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी), स्वेरी, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर येथे तर पदव्युत्तर शिक्षण: एम.ई. (संगणक अभियांत्रिकी), सिंहगड इन्स्टिटयूट, पुणे येथे झाले आहे.कागदे यांच्या या यशाबद्दल दसूर गावासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments