इटकळ येथील पत्रकार दिनेश सलगरे यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ प्रतिनिधी:- मौजे इटकळ येथील ग्रामीण परिसरात सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच कार्यरत असलेले पत्रकार दिनेश गुंडेराव सलगरे यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी रविवार दि.१९ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह तुळजापुर येथील आयोजित संघटनेच्या बैठकीत केली. इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे यांनी गेल्या पंधरा वर्षांत गाव परिसरात प्रिंट मिडिया व डिजिटल मिडियाच्या माध्यमातून सर्व सामान्यांना नेहमीच न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला त्यांच्या या कामाची दखल घेऊन डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिनेश सलगरे यांची धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र दिले. दिलेल्या नियुक्ती पत्रात डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकाचे हित जोपासण्यासाठी आणि या माध्यमाला सामाजिक मूल्य तसेच सामजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत करण्यासाठी आपण सदैव कार्यशील आहात , संघटनेची ध्येय धोरणाचे पालन करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे नमूद करण्यात आले आहे. पत्रकार दिनेश सलगरे यांनी गेल्या वीस वर्षांपासून गाव परिसरात दैनिक तरुण भारत व वृत्तवेध चैनलच्या माध्यमातून सकारात्मक अशी पत्रकारिता करीत सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ही प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नशील असतात. भविष्यात ही सकारात्मक लिखाणातून सर्व सामान्यांना न्याय देत संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, एन.टी.व्ही. न्युजचे संपादक इक्बाल शेख यांच्यासह तुळजापुर, उमरगा, नळदुर्ग, अणदूर , मंगरुळ , इटकळ येथील पत्रकार बांधव उपस्थित होते. ग्रामीण पत्रकार दिनेश सलगरे यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने गाव परिसरातून व मित्र परिवारातून अभिनंदनपर कौतुक केले जात आहे.
0 Comments