Hot Posts

6/recent/ticker-posts

अणदुर परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अणदुर परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


 धाराशिव:दि २० : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील चिवरी -अंदुर या रस्त्यावरील बालाजी कुलकर्णी यांच्या शेताजवळ एका चार चाकी वाहनासमोर सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरात बिबट्या वावर आढळल्याने अणदुरसह चिवरी परिसरातील  शेतकरी वर्गात, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुळजापूर तालुक्यातील अनदुर येथील चिवरी अणदूर या रस्त्यावरील इनाम बादशहा या माळाजवळील बालाजी कुलकर्णी यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडी समोरून बिबट्या निघून गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आढळून आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत  अणदूरचे पोलीस पाटील जावेद शेख यांनी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून  अनेक ठिकाणी बिबट्या आढळून येत आहे तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे व वासरे या बिबट्याने फाडल्याच्या घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्यातच  सोमवारी दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळच्या   सुमारास तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील चिवरी अंदुर रस्त्यावरील बालाजी कुलकर्णी यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडी समोरून हा बिबट्या पसार झाल्याची माहिती चिवरीचे माजी सरपंच बालाजी पाटील व त्यांच्या  सहकाऱ्यांनी माहिती दिली आहे .,त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली  असून त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी रात्री सावध राहावे असे आवाहन अंदुरचे पोलीस पाटील जावक शेख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments