उमरगा : बलसुर शिवारात ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेत मजुरांचा मृत्यू
धाराशिव : उमरगा तालुक्यातील बलसुर शिवारात ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेतमजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना दिनांक 30 रोजी घडली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बलसुर -कडदोडा मार्गावरील सास्तुर तलावाजवळ ज्वारीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून दोन शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला कडदोडा येथील व्यंकट राम बालकुंदे वय (५९) व बलसुर येथील कुरशीद अमिरसाब बडगिरे वय (६०) असे मयतांचे नाव आहे. त्यांच्या या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments