धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजचे प्रा. श्री. गर्जे यांना 'साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार' प्रदान
धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे कार्यरत असलेले प्राध्यापक श्री. पी. ए. गर्जे यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती, धाराशिव यांच्या वतीने साने गुरुजी जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. गर्जे यांना हा पुरस्कार शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी मा. आमदार श्री. कैलास पाटील, माननीय थोर शिक्षणतज्ञ श्री. एम. डी. देशमुख सर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व साहित्य यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
यानिमित्ताने श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे देखील प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर यांनी श्री. गर्जे सर यांचा शाल व बुके देऊन सत्कार केला. या पुरस्काराबद्दल संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य भैया पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, उपमुख्याध्यापक श्री. प्रमोद कदम सर, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.
0 Comments