Hot Posts

6/recent/ticker-posts

नामांतर लढ्यातील लढवय्या पॅंथर आणि तत्कालीन सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचा नामांतर दिनानिमित्त जाहीर सत्कार

नामांतर लढ्यातील लढवय्या पॅंथर आणि तत्कालीन सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचा नामांतर दिनानिमित्त जाहीर सत्कार


धाराशिव : जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉ नितीन ढेपे साहेब यांच्या हस्ते उस्मानाबाद जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे वतीने नामांतर लढ्यातील लढवय्या पॅंथर आणि तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .

यावेळी भागवत सोपान डोलारे, सावरगाव तालुका तुळजापूर दादासाहेब जेटीथोर भीम नगर उस्मानाबाद, सुधाकर सटवा कटारे सारोळा बुद्रुक तालुका उस्मानाबाद दामोदर मसाजी वाघमारे व्ही एस गायकवाड डी जे बनसोडे  धावारे (गुरुजी)रामलिंग वाघमारे यल्लाप्पा दुपारगुडे मोतीराम चिमणे आर एस गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला अनिल हजारे तानाजी बनसोडे मुकुंद लगाडे नाशिर शेख अनेकांनी मनोगत व्यक्त केले, भागवत सोपान डोलारे धावारे गुरुजी

यांनी आपल्या भाषणात त्यांचे अनुभव सांगितले.

त्यांच्यावर हल्ला कसा झाला.त्याना जेल मध्ये कोणत्या ठेवले तिथली परिस्थिती यावर कशी आणि कोण मदत केली.

मोर्चा काढण्यात आल्यावरच समाजातील काही लोकांचे सहकार्य पोलीसांनी ताब्यात घेतले होते त्यावेळी काय प्रसंग होता आणि आज आपण काय करतो आहोत असे अनेक जन आपल्याला भाषणात खंत व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आणि नामांतर लढ्यातील लढवय्या भिमसैनिक पोचीराम कांबळे, तसेच सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि पुढील नामांतर लढ्यातील लढवय्या पॅंथर यांच्या सत्कार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले आणि आभार आर एस गायकवाड यांनी मानले . 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉ नितीन ढेपे साहेब,, बाबासाहेब जानराव साहेब, युवा जिल्हा अध्यक्ष शितल चव्हाण, अँड प्रविण ढिकले, डॉ स्नेहा सोनकाटे मॅडम हे मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले. यावेळी  जिल्हा नेते तानाजी बनसोडे, अनिल हजारे, मुकुंद लगाडे ,उमेश भालेराव ,बाळासाहेब कदम ,शकील सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा युवा संघटक बाबा वाघमारे,युवा जिल्हा अध्यक्ष शितल चव्हाण ,विद्यानंद वाघमारे युवा तालुका अध्यक्ष सागर चंदनशिवे ,युवा तालुका कळंब महासचिव मिलिंद खुने,  बाबासाहेब जानराव अनिल हजारे नासिर शेख,बडे भाई,आर एस गायकवाड  रमेश गंगावणे, यानी परिश्रम घेतले .





Post a Comment

0 Comments