Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे केशेगाव येथे श्रीमती गोदावरी रेवणसिद्ध पाटू यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सव व तुलाभार सोहळा उत्साहात संपन्न.

मौजे केशेगाव येथे श्रीमती गोदावरी रेवणसिद्ध पाटू यांचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सव व तुलाभार सोहळा उत्साहात संपन्न.


"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):-तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीमती गोदावरी रेवणसिद्ध पाटू यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस व साखर तुलाभार सोहळा पाटू परिवारातर्फे साजरा करण्यात आला. आजच्या या धावपळीच्या व्हाट्सअप, फेसबुकच्या युगात आजची तरुण पिढी आई-वडिलांपासून दूर राहून त्यांचे कष्ट विसरून त्यांना वृद्धाश्रमात ठेवत आहेत तरी केशेगाव येथील पाटू परिवाराने आपल्या आई-वडिलांचे केलेले कष्ट, त्याग याची जाणीव ठेवून आपल्या आईचा 75 वा वाढदिवस सर्व मुले नातू ,पणतु यांच्या उपस्थितीत साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे व तसा एक संदेश समाजाला दिला आहे.

याप्रसंगीत दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित नातेवाईक मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी सरपंच मल्लिनाथ गावडे, उपसरपंच लक्ष्मण क्षिरसागर, श्री सिद्धाराम हेले (सोलापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस) श्री शरणप्पा उमाटे, श्री संगमेश्वर जळकोटे सर, श्री कल्याणराव पाटू, श्री सूर्यकांत पाटू, श्री चनबस पाटू, श्री अशोक साखरे गुरुजी, श्री नागनाथ जळकोटे सर, श्री संजय शिवकर, श्री शिवानंद बिराजदार, ॲड. यशवंत पाटील, श्री शिवानंद भुजबळे,मल्लिनाथ जळकोटे,प्रतिशकुमार मुडके, हरिश्चंद्र साखरे व पाटू परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट उपस्थित होते.

अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री प्रा. जळकोटे सर,अशोक साखरे सर, चनबस पाटू सूर्यकांत पाटू, लक्ष्मण क्षीरसागर, राजकुमार पाटू अशोक साखरे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिदानंद हंद्राळे यांनी व आभार प्रदर्शन श्री सतीश पाटू व शिवशंकर पाटू यांनी केले व तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाटू परिवाराच्या मित्रमंडळीने विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments