शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा! राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक
छत्रपती संभाजीनगर: पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र क्रमांक आता अनिवार्य करण्यात आली आहे विसाव्या हफ्त्यापासून नवीन नियम लागू करण्यात आले असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहेत. खरंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकारच्या ऍग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याचे आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे.
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता मागील महिन्यामध्ये वितरित केला गेला या त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकाची अट लागू नसल्याने हा हप्ता शेतकऱ्यांना बिन दिक्कतपणे मिळाला आहे मात्र आता विसाव्या हफ्त्यापासून शेतकरी ओळखपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक होणार आहे तथापि नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पती-पत्नी आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबातील सदस्याची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. नियमाचे पालन केले नाही तर पीएम किसान चे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाहीत असे हे आदेश आहेत.
शेतकऱ्यांची धावाधाव
- केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षा ऍग्री स्टिक योजनेअंतर्गत राज्य शासनाने नुकताच सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
- या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नोंदणी क्रमांक आणि पूर्वीचा ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे.
- यासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवायसी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी धावा धाव सुरू झाली आहे नोंदणीसाठी शेतकरी सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी उसळून गेलेले दिसून येत आहे.
0 Comments