हिंदू विवाह पवित्र बंधन वर्षभरात तोडता येणार नाही अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा-
प्रयागराज : दोन हिंदू व्यक्ती दरम्यान विवाह हे एक पवित्र बंधन आहे त्यामुळे भलेही दोन्ही पक्ष परस्पर सहमतीने विभक्त होण्यासाठी तयार असतील तरीही वर्षभराच्या आत विवाह संबंध तोडता येणार नाही असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.
हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 14 नुसार जोपर्यंत व सामान्य परिस्थिती तथा अनैतिक तिची समस्या निर्माण झालेली नसेल तोपर्यंत विवाह वर्षभराच्या आत तोडता येणार नाही असे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती डी. रमेश यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यासंदर्भात कलम 14 मध्ये विवाहाच्या तारखेपासून किमान एक वर्षाची मुदत पूर्ण होण्याची अट निर्धारित करण्यात आली आहे परंतु असामान्य परिस्थिती तथा अनैतिकतेच्या समस्येवेळी अशा अर्जावर विचार केला जाऊ शकतो .,पण संबंधित प्रकरणात दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता त्यामुळे खंडपीठाने अर्ज फेटाळून लावत वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने घटस्फोटासाठी अर्ज करण्यास सांगितले.
किमान वर्षभराचा कालावधी पूर्ण न झाल्याच्या मुद्द्यावरूनच यापूर्वी सहारनपुरच्या कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला होता त्यामुळे संबंधित जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
0 Comments