Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

धाराशिव : श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार


धाराशिव : श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे दिनांक २६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या  PW SAT (फिजिक्स वाला) या परीक्षेच्या NEET आणि JEE मधील अनुक्रमे १५ - १५ टॉप विद्यार्थ्यांचा संस्थेचे सीईओ श्री. आदित्य भैया पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना शिष्यवृत्ती म्हणून फीस मधून फिजिक्स वाला यांच्याकडून एकूण २०% सवलत देण्यात आली. या परीक्षेसाठी इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील एकूण ३ हजार पाचशे विद्यार्थी बसले होते. येत्या १८ मार्च रोजी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी देखील ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेत देखील येणाऱ्या अशा टॉपर्स विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून फीस मध्ये अशीच सवलत फिजिक्स वाला यांच्याकडून दिली जाणार आहे. सर्व टॉपर्स विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, श्री. भगत सर, श्री. शिंदे सर, श्री. मोमीन सर, श्री. सदाफुले सर, श्री. आंबेवाडीकर सर, श्री. चतुर्वेदी सर, श्री. तेली सर आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments