चिवरी येथील यात्रेतून मोटरसायकल लंपास, नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिव - यात्रेत लावलेली मोटरसायकल चोरट्याने लंपास केली हे घटना तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेमध्ये घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तुळजापूर येथील रहिवाशी मुकेश दिलीप शिरसाठ हे चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत गेली होते. दरम्यान त्यांची स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल (एम एच २५-बी डी ४३४७) चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी दिनांक 18 रोजी रात्री आठ ते साडेदहा या कालावधीत ही चोरीची घटना घडली. याप्रकरणी शिरसाठ यांनी सोमवारी दि,२४ रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments