Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे बर्ड फ्लूचा शिरकाव, पाच दिवसात गावात 21 कावळ्यांचा बळी ! प्रशासन ॲक्शन मोडवर-Dharashiv Dhoki in bird flu virsus

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे बर्ड  फ्लूचा  शिरकाव, पाच दिवसात गावात 21 कावळ्यांचा बळी ! प्रशासन ॲक्शन मोडवर-Dharashiv Dhoki in bird flu virsus


--------------------------------------------------------------------------

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे पाच दिवसात तब्बल 21 कावळ्यांचा या रोगाने बळी घेतला आहे मयत कावळ्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता विषाणूचा संसर्ग आढळला आहे यामुळे ढोकीच्या दहा किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे दरम्यान डोकी ग्रामपंचायतने बाधित ठिकाणी दोन टक्के सोडियमची फवारणी केली.

ढोकी येथे पोलीस ठाण्याच्या आवारात चार कावळे व देशमुख यांच्या घराच्या परिसरात चार मृत कावळे शुक्रवारी दिनांक 21 रोजी आढळून आले या मृत कावळ्याची माहिती ढोकी  येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष टेकाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली जिल्हा पशुसंवर्धन आरोग्य अधिकारी डॉक्टर यतीन पुजारी यांना ही माहिती मिळाली; त्यांनी ढोकी येथील बाधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली पशुसंवर्धन विभागणी या कावळे ची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाकडे हस्तांतरित केले व दोन कावळे पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले पुण्याच्या प्रयोगशाळेतून भोपाळ येथील प्रयोगशाळेत ते पाठवण्यात आले शनिवारी दिनांक 22 रोजी पोलीस चौकीच्या आवारात दोन कावले तर देशमुख यांच्या घराच्या परिसरात एक रविवारी दिनांक 23 रोजी पोलीस ठाणे आवारात पाच कावळे सोमवारी दिनांक 24 रोजी पोलीस ठाण्यावर तीन व देशमुख यांच्या घराच्या परिसरात एक व मंगळवारी दिनांक 25 रोजी देशमुख यांच्या घराच्या परिसरात एक असे तब्बल 21 कावळे मृत अवस्थेत आढळून आली आहे. भोपाळ येथील प्रयोगशाळा पाठवण्यात आलेल्या कावळ्यांना अहवाल बर्डफ्यूचा प्रादुर्भाव झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग आरोग्य पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीने तात्काळ सुरक्षेच्या अनुषंगाने उपयोजना सुरू केले आहेत.

 ढोकी  येथील काही भागात विषाणूचा संसर्ग आढळल्याने संपूर्ण दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ढोकी  ग्रामपंचायतने मटन शॉप व्यवसायिक यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत; प्रभारी जिल्हाधिकारी प्रकाश अहिराव यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत ज्या परिसरात विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आला त्या बाधित परिसराचे निर्जंती करून करण्यासाठी दोन टक्के सोडियम हाय वोक्लोराइड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट वापरण्याचे सूचना पशुसंवर्धन विभाग , आरोग्य व ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन आरोग्य अधिकारी डॉक्टर पुजारी सहाय्यक आयुक्त डॉक्टर मुकुंद तावरे पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर कमलाकर शेळके डॉक्टर टेकाळे उपसरपंच अमोल समुद्रे यांच्या टीमने मंगळवारी ढोकी पोलीस ठाणे परिसर व बाधित ठिकाणी भेटी दिल्या .ग्रामपंचायत कर्मचारी यांनी  परिसरात जाऊन फवारणी केली.

Post a Comment

0 Comments