धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करा - आपचे उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
धाराशिव प्रतिनिधी :जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, अनेक साखर कारखान्यांकडून ऊस बिलाच्या वेळेवर अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. मधुकर बबनराव शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की ,एफआरपी कायद्यानुसार, गळीत हंगाम संपल्यानंतर १४ दिवसांच्या आत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत असून, शेतकऱ्यांना त्यांचा मेहनतीचा मोबदला मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे.
शेतकरी हा ऊस उद्योगाचा कणा आहे. पण साखर कारखान्यांकडून त्यांच्या हक्काच्या पैशांसाठीच लढावे लागते, हे दुर्दैवी आहे. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले तातडीने अदा करावीत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल," असा इशारा श्री. शेळके यांनी दिला आहे.यावेळी सुहास कानडे ,विकास घोडके रोहित शेंडगे कृष्णा मोरे,आदी उपस्थित होत..
या निवेदनाची प्रत श्री.शेळके यांनी विभागीय आयुक्त संभाजीनगर आणि साखर आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे. आता प्रशासन या निवेदनावर काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0 Comments