अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व 21 हजार रुपयांचा दंड धाराशिव विशेष न्यायालयाचा निकाल
धाराशिव : बांधकामावर काम आहे अशी आम्ही अमिष दाखवून मजूर महिलेच्या अल्पवयीन मुलीच फूस लावून पळून नेते नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षे सक्त मंजुरी व 21 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा धाराशिव येथील विशेष न्यायालयाने सुनावले आहे. ही घटना 7 मे 2019 रोजी घडली होती.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की घटनेच्या दोन वर्षापूर्वीपासून आरोपी हकीम काजी व पीडीतीचे कुटुंब एकत्र ऊसतोड कामगार म्हणून विविध ठिकाणी काम करत होते दरम्यानच्या काळात आरोपीस तिच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन पिडीतीतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला ऊस तोडीचे काम संपल्यानंतर आरोपीने पीडितेस व तिच्या आईस एका बांधकाम मिस्त्री याकडे मजूर म्हणून काम मिळवून दिले दरम्यान 7 मे 2019 रोजी पीडित ही एकटी बांधकामाच्या कामावर जात असताना आरोपी हकीम काजी यांनी आज बांधकामावर काम नाही दुसरीकडे काम आहे असे म्हणून तिला त्याच्या आपशिंगा येथील शेतात घेऊन गेला.
त्यानंतर बसने तिला प्रथम हुमनाबाद व नंतर जहीराबाद येथे घेऊन गेला यावेळी पिडीतीला बुरखा घालण्यास देऊन हकीम काजी यांनी त्याच्या लहान मुलासोबत 26 मे 2019 पर्यंत रूमवर ठेवले त्या दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले .इकडे गावाकडे दिनांक सात मे रोजी पीडिता कामावरून घरी न परतल्याने आईने शोध सुरू केला दरम्यान तिला आरोपी हक्क मेहबूब काजी (राहणार रामनगर सांजा रोड धाराशिव )हा घेऊन गेल्याची कळाल्याने पिढी तिच्या आईने आरोपी हकीमकाजी विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही सिद्धी व एस. जी भुजबळ यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सदर प्रकरणाची सुनावणी तत्कालीन विशेष न्यायाधीश श्री जगताप व विशेष न्यायाधीश श्रीमती मिटकरी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली.
सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेली साक्षीदार व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी हकीम मेहबूब काजी यास वेगवेगळ्या तीन कलमाने दोषी आढळून आल्याने दहा वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक सी.बी तर्फेवाढ यांनी काम पाहिले.
आरोपी तीन मुलाचा बाप
सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध दोष सिद्धीसाठी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणातील पीडीतेची नैसर्गिक साक्ष मुख्याध्यापकाची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. धक्कादायक बाब म्हणजे प्रकरणातील आरोपी हा विवाहित असून त्यास तीन मुले असतानाही अल्पवयीन पीडीतीवर त्यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तपास आतून समोर आले आहे यानुसार आरोपीला सदरची शिक्षा ठोठावण्यात आली.
0 Comments