दुःखद घटना : कालव्यातील पाण्यात बुडून माय-लेकीचा मृत्यू, लोहारा तालुक्यातील घटना
धाराशिव: शेतातील हरभऱ्याचे डहाळे धुण्यासाठी कालव्याकडे गेलेल्या माय लेकींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे घडली आहे. सास्तुर येथून वाहणाऱ्या निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील पाण्यात बुडून या दोन माय लेकींचा मृत्यू झाला असून शनिवारी दुपारी एकाच चितेवर भडाग्री देण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे लोहारा तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अलका उमाकांत माने वय (36) निकिता माने वय (16) अशी मयतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत अलका व त्यांची मुलगी निकिता या दोघी शुक्रवारी दिनांक 14 रोजी शेताकडे गेले होते शेतात गेल्यानंतर त्यांना हरभऱ्याची डहाळे खाण्याचा बेत केला उन्हाळी पिकांसाठी निम्न -तेरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे डहाळे धुण्यासाठी मायलेकी गेल्या डहाळे धुत असताना अलका यांचा अचानक तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या, आईला वाचवण्यासाठी मुलगी निकितानेही कालव्यात उडी मारली याची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कालव्याकडे धाव घेतली परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे मायलेकींना वाचवता आले नाही यात दोघींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी तात्काळ निम्न पेरणीच्या उजव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यास सांगितले पाणी बंद केल्यानंतर दीड एक तासानंतर आई अलका यांचा मृत्यू आढळला परंतु मुलगी निकिताचा शोध लागला नाही अथक प्रश्नानंतर रात्री सव्वा बाराच्या सुमारास कालव्याच्या बाजूस असलेल्या झुडपात निकिताचा मृतदेह मिळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे पोलीस हवालदार विठ्ठल धवन आकाश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली दरम्यान रात्री उशिरा मृतदेह सापडला दिनांक 15 रोजी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दोघींवर काळाचा घाला
निकिता शाळेत अत्यंत हुशार होती सध्या ती दहावी बोर्डाची परीक्षा देत होती परीक्षेच्या पेपरला शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी असल्यामुळे निकिता आपली आई सोबत शेताकडे गेली होती निकिताला पोहता येत होते त्यामुळे तिने कालव्यात पडलेले आईला वाचण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतु घाबरलेल्या आईने निकिताला एकदम घट्ट मिठी मारल्यामुळे दोघींचा करूण अंत झाला.
0 Comments