मुंबई : विलंबित जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेवरील स्थगिती उठवली हजारो नागरिकांना दिलासा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून परिपत्रक जारी
मुंबई: राज्यातील जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी विलंबित नोंदणी प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 12 मार्च रोजी सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या हस्ते परिपत्रक जारी करण्यात आली आहे.
जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि सुधारित अधिनियम 2023 अन्वे पूर्वी जन्ममृत्यूची नोंद एकाच वर्षाच्या आत न झाल्यास प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा शहर दंड अधिकाऱ्यांचे आदेशावरून ती केली जात असे. मात्र 11 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने सुधारणा करत जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाध अधिकाऱ्यांना यासाठी अधिकृत केली आहे. परदेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र वितरित केल्याच्या तक्रारींच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाने 8 जानेवारी रोजी ग्रह विभागाच्या विशेष तपास समितीची स्थापना केली होती. विशेष महानिरीक्षक नाशिक परिषदच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या चौकशीत अनेक अनियमितत्ता उघडकीस आल्या त्यामुळे महसूल विभागाने 21 जानेवारी रोजी विलंबित जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती.
शाळा प्रवेश पासपोर्ट सातबारा उतारा शासकीय आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांची आवश्यकता असते मात्र विलंबित प्रमाणपत्र न मिळालेली नागरिकांना अडचणी येत होत्या. महसूल विभागाने परिस्थितीचा आढावा घेत 21 जानेवारी रोजी लावलेली स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे .
0 Comments