मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या , धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव: अनेक ठिकाणी मुलाखती देऊनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी दिनांक 17 रोजी पहाटे घडले असून यावेळी तरुणांच्या खिशात मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिट्ठी मिळाली आहे.
यावेळी ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी करत तब्बल दोन तास मृतदेह झाडावरून खाली काढू दिला नाही हा तरुण दोन दिवसांपूर्वी पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देऊन देवळाली तालुका कळंब येथे परत आला होता ;पण नोकरी मिळत नसल्याने तो निराश झाला होता. कळंब तालुक्यातील देवळाली येथील योगेश संजय लोमटे वय 26 या तरुणाचे बीकॉम शिक्षण झाले आहे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता तसेच विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखती देत होता योगेश दोन दिवसापूर्वी पुणे येथील एका खाजगी कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देण्यास गेला होता तो नोकरीच्या शोधात होता; परंतु यश मिळत नसल्याने तो निराश होता दरम्यान तो सोमवारी पहाटे पुणे येथून गावाकडे परतल्याचे कळते गावात आल्यानंतर स्वतःच्या शेतात जाऊन त्याने आई व भावास फोन करून बोलणे केले यावेळी त्यांनी मी आत्महत्या करत आहे असे सांगत त्यानंतर चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती समजतात कुटुंबासह ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. त्यानंतर बीट अंमलदार श्री राठोड व तलाठी नितीन कांबळे घटनास्थळी दाखल झाले यावेळी केलेल्या पाहणीत योगेशच्या खिशात मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आढळली.
मराठा आरक्षण देण्याची ग्रामस्थांची मागणी
यामुळे ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा तोपर्यंत आम्ही झाडावरचा मृतदेह खाली उतरू देणार नाही असा पवित्रा घेतला यामुळे वातावरण थोडे तणावाची झाले यावेळी तलाठी व बीट अंमलदार यांनी ग्रामस्थांची मागणी वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याची आश्वासन दिल्यानंतर दोन तासाने मृतदेह खाली घेण्यात आला याप्रकरणी मयताची चुलते राजकुमार लोमटे यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
0 Comments