कळंब :महिला वाहकाचा वाहतूक नियंत्रकाकडून विनयभंग
कळंब : राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांचा तेथे कार्यरत वाहतूक नियंत्रकाने विनयभंग केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे ही घटना मंगळवारी दिनांक चार रोजी घडली असून याप्रकरणी वाहतूक नियंत्रकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेली महिला कर्मचारी ही मंगळवारी दिनांक 4 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एकटी घराकडे जात होती यावेळी वाहतूक नियंत्रकाने दारूच्या नशेत येऊन अंधाराचा फायदा घेत त्या महिलेस घातले. फिर्यादी महिला वाहकाचा हात पकडून तिला लज्जास्पद बोलून त्याने तिचा विनयभंग केला या प्रकरणी पीडित महिला वाहकाने संबंधित पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार वाहतूक नियंत्रकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments