Itkal News:जागतिक महिला दिनानिमित्त इटकळ पंचरत्नाचा सन्मान सोहळा
वार नाही तलवार आहे, ती समशेर धार आहे.
स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर पेटता अंगार आहे.
"""""""""""""""""'""""""""""""''"""""""""''"""
इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त इटकळरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील पाच महिलांचा इटकळरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्रीम. रत्नाबाई बाबुराव हंन्नूरे आदर्श उद्योजिका, श्रीमती. पार्वती गंडेराव सलगरे आदर्श माता, श्रीम. रिजवाना रफिक मुजावर महिला कंडक्टर, प्रियांका कबीर मिटकरी उमेद प्रेरिका, श्रीम. परवीन ताजोद्दीन मुजावर आदर्श पालक यांचा ट्रॉपी देऊन सन्मान करण्यात आला.
तुळजापूर तालुका शिक्षक सोसायटीचे संचालक स्वामी नागेश यांचा कडून कृतज्ञता सन्मान मानपत्र देऊन इटकळ पंच रत्नांचा सत्कार करण्यात आला.पाककृती व संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले होते. पाककृती मध्ये प्रथम अंबिका माशाळकर, द्वितीय चेलाली गवळी, तृतीय प्रगती माशाळकर
तर संगीतखुर्ची स्पर्धेत प्रथम पूनम बर्वे, द्वितीय सुवर्णा वाघमोडे, तृतीय स्वाती खटके यांना शा. व्य स. अध्यक्ष प्रवीण माशाळकर यांचा हस्ते बक्षीस देण्यात आले.मुख्याध्यापक तानाजी गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर असून मुलांच्या शिक्षण व कुंटूंबातील जबाबदारी सोबत राष्ट्र निर्माणासाठी योगदान मोठे आहे. या कार्यक्रमासाठी इटकळ गावचे सरपंच साहेबराव क्षीरसागर, प्रविण माशाळकर, फिरोज मुजावर, रफिक मुजावर, श्रीकृष्ण मुळे, पोलीस पाटील विनोद सलगरे, दयानंद गायकवाड, दादा भोपळे, पत्रकार केशव गायकवाड,परमेश्वर हंन्नूरे, विजया कट्टे मु. अ तानाजी गायकवाड, बालाजी कदमसर, सुधाकर कांबळेसर ,सतीश ढोणेसर,रवींद्र गायकवाडसर,नागेश स्वामीसर संगीता घुगेमॅडम ,वैशाली देशमाने मॅडम, जया भोसले मॅडम,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जया भोसले तर मनोगत संगीता घुगे यांनी मांडले. सन्मान पत्राचे वाचन बालाजी कदम यांनी केले. संकल्पना नागेश स्वामी तर आभार सुधाकर कांबळे यांनी मांडले.
0 Comments