गोळीबार करून खून करणाऱ्या जवानाला जन्मठेप, पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
सोलापूर: जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात गोळीबार करून एका महिलेला जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यातील आरोपी भारतीय लष्करातील जवानाला जीवनाच्या अंतापावेतो जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी .एन .सुरवसे यांनी सोमवारी ठोठावली आहे.
बिरू नामदेव पांढरे वय (40) राहणार उदनवाडी तालुका सांगोला असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे उदनवाडी येथील दत्तात्रय पांढरे यांनी जमीन गट नंबर 68 खरेदी केली होती या जमिनीला आम्ही कुळ आहे ती तुम्ही खरेदी का केली? असे म्हणत दिनांक 19 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता यातील बिरू पांढरे व इतरांनी दत्तात्रय पांढरे व इतरांना मारहाण केली. यादरम्यान बिरू यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून गोळीबार करून उज्वला पांढरे यांना ठार मारले. तसेच काकासाहेब पांढरे विष्णू पांढरे, भगवान पांढरे , नामदेव पांढरे , पांडुरंग धायगुडे,यांनी लोखंडी पाइपने दत्तात्रय पांढरे व साक्षीदार अर्जुन पांढरे, जयवंत पांढरे , कुसुम पांढरे, सुमन पांढरे यांना जीवे मारण्याचे हेतूने मारहाण करून जखमी केली इतर आरोपी कमलाबाई पांढरे, मालन पांढरे ,पूजा पांढरे यांनीही चिथावणी देऊन दगडफेक केली अशा आशियाची फिर्याद दाखल करण्यात आल्याने सांगोला पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानसहिता कलम 302 307 143 147 148 149 कलम 325 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 18 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या त्यामधील फिर्यादी दत्तात्रय पांढरे जखमी जयवंत पांढरे उत्तम पांढरे हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भुई तसेच जखमेवर उपचार करणारे डॉक्टर डी डी गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर करचे महादेव कुंभार पोलीस नाईक सावजी व इतर कर्मचारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे एडवोकेट सारंग वांगीकर यांनी काम चालवले सर्व बाबीचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाने आरोपी बिरू पांढरे यास खून प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व इतर आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली यात सरकारी वकील म्हणून एडवोकेट सारंग वांगीकर यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजू माने यांनी काम पाहिले.
मुलाच्या बारशाला आला आणि अन खून केला
यातील आरोपी बिरू पांढरे हा भारतीय लष्करात नोकरीस असून मुलाचे बारशाकरता तो गावी आला होता यावेळी भांडणात त्यांनी गोळीबार केला होता या घटनेनंतर अनेक दिवस तो फरार होता तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बंदूक पोलिसांना दिली नव्हती खूप दिवस शोध घेतल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागला अटके नंतर त्याला जामीन मिळालेला नव्हता.
0 Comments