Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी १५ एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य-Agristack Scheme

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी १५ एप्रिल पासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य-Agristack Scheme


मुंबई: कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी(Farmer Id) येत्या 15 एप्रिल पासून अनिवार्य करण्यात आले असल्याचा शासन निर्णय शुक्रवारी कृषी विभागाने जारी केला ज्या शेतकऱ्याने अजूनही शेतकरी ओळखपत्र क्रमांक साठी नोंदणी केली नाही अशा शेतकरी तातडीने पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी अशी आव्हाने करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना जलद आणि परिणाम कारक लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक(Agristack) योजना राबविण्यात येत आहेत. विविध योजनेचे अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित आधार संलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री हंगामी पिकांचा माहिती संच तसेच जिओ रेफरल पार्सल माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची आणि त्याच्या शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी( Farmer ID)  देण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा फार्मर आयडी(Farmer Id) आता १५ एप्रिल पासून अनिवार्य करण्यात येत आहे . त्यानुसार सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळ ऑनलाईन प्रणाली मध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यांच्याशी संलग्नित डेटा आणि त्यावर केलेली पिके याची माहिती ॲग्रीस्ट्रॅक या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments