Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील महिला सरपंच पदाची बुधवारी आरक्षण सोडत, गावपुढाऱ्याच्या आरक्षणाकडे लक्ष

धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील महिला सरपंच पदाची बुधवारी आरक्षण सोडत, गावपुढाऱ्याच्या आरक्षणाकडे लक्ष


धाराशिव: जिल्ह्यातील धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील एकूण ३१८ ग्रामपंचायतच्या महिला सरपंच पदाची बुधवारी दिनांक १६ रोजी आरक्षण सोडत करण्यात येणार आहे यामध्ये धाराशीव तालुक्यातील ११० तर तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीतील एससी, एसटी ,ओबीसी , सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.धाराशिव तालुक्यातील आरक्षण सोडत सकाळी ११ वाजता नियोजन भवन धाराशिव  येथे  उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तर तुळजापूर येथील सोडत रोहयोचे उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय स्पोर्ट हॉल तुळजापूर येथे पार पडणार आहे.तरी या सोडतीस सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी  उपस्थित राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments