Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील शेतकरी कन्या डॉ. यशांजली दयानंद गडदे यांनी एम.बी.बी.एस. परिक्षेत मिळवले उज्वल यश

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील शेतकरी कन्या डॉ. यशांजली दयानंद गडदे यांनी एम.बी.बी.एस. परिक्षेत मिळवले उज्वल यश.

"""""""""""""""""'""""""""""""""""""""'""""""""

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत केले शेतकरी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण.

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


इटकळ ( दिनेश सलगरे ):- तुळजापुर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील शेतकरी कन्या असलेल्या डॉ. यशांजली दयानंद गडदे यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथून एम.बी.बी.एस. परीक्षा २०२५ मध्ये झालेल्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उतीर्ण होऊन एम बी.बी.एस.डॉक्टर ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचे गाव परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.डॉ.यशांजली दयानंद गडदे या तुळजापुर तालुक्यातील मौजे काळेगाव येथील रहिवाशी असुन 

त्यांनी इयता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा काळेगाव येथे पूर्ण केले तर पुढील शिक्षणासाठी ती लातूर येथील शिवाजी विद्यालयात प्रवेश घेतला. आठवीत नवोदय परीक्षा पास झाली व ९ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय लातूर येथे सी.बी.एस.सी.पॅटर्न प्रमाणे पूर्ण केले. इयत्ता दहावी सी.बी.एस.सी.बोर्ड मध्ये कसलीही शिकवणी न लावता ९२ टक्के गुण मिळविले तर बारावी सी.बी.एस.सी.बोर्ड परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत नवोदय विद्यालय लातूर येथून प्रथम क्रमांक पटकावला. लहान पणा पासूनच हुशार असलेल्या यशांजलीची निवड दक्षिणा इंटरनॅशनल फाऊंडेशन खडूस पुणे येथे एक वर्ष टीचींग प्रोग्रामसाठी झाली.२०१९ ला नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पहिल्याच निवड यादीत डॉ.यशांजली गडदे यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे प्रवेश मिळवला.ग्रामीण भागातील एका छोट्याशा खेडेगावात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या डॉ.यशांजली दयानंद गडदे यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज मध्ये असलेली, कडक शिस्त,नियम यांचे काटेकोर पणे पालन करून चार वर्षाचे खडतर मेडिकल कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले.

जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या शेवटच्या वर्षाच्या परिक्षेची परिक्षा देऊन त्यानी यश संपादन केले.या यशामध्ये  मार्गदर्शन करणारे तिचे शिक्षक तसेच आई सौ.योगेश्वरी दयानंद गडदे, शेतकरी वडिल श्री.दयानंद रामचंद्र गडदे, भाऊ यशदिप दयानंद गडदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेतकरी कन्या असलेल्या डॉ.यशांजली दयानंद गडदे यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉक्टर होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असल्याने गाव परिसरातून डॉ.यशांजली गडदे यांचे सर्वत्र कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments