Hot Posts

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार शिक्षकाला १४ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई :अल्पवयीन मुलीवर अत्याचार शिक्षकाला १४ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल


अंबाजोगाई : गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कालीमा फासत अल्पवयीन विद्यार्थी वर सातत्याने अत्याचार करणाऱ्या श्याम दिगंबर वारकड या शिक्षकास अंबाजोगाई सत्र न्यायालयाने 14 वर्षे सश्रम कारावास आणि एकूण एक लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठेवली आहे

मराठवाडा बर गाजलेल्या या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी शहरातील खोलेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी क्रीडा शिक्षक श्याम दिगंबर वारकड यांच्यासोबत जालना येथे गेली होती स्पर्धेतून परतत असताना वाहनांमध्ये शिक्षकांनी तिच्यासोबत छेडछाड केली जालन्याहून परत आल्यानंतर अंबाजोगाई येथील क्रीडा संकुल परिसरात वाहनांमध्ये १७ ऑक्टोबर 2019 रोजी यांनी तिच्यावर अत्याचार केला ही घटना कोणालाही सांगू नकोस असे शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकावली होते. त्यानंतर त्या मुलीवर नराधम शिक्षकाने अनेक वेळा अत्याचार केल्याची समोर आले पीडित मुलगी भयभीत अवस्थेतील होती तिची अवस्था शाळेमधील एका महिला शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर तिने विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यानंतर या घटनेची भिंग फुटले त्या मुलीने अंबाजोगाई शहर पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर श्याम वारकड यांच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात पोषक कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला डीवायएसपी राहुल धस यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दहशतपत्र सादर केले.

न्यायालयाने तपासले १३ साक्षीदार

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश खोचे यांच्यासमोर झाली न्यायालयासमोर एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी पीडिता आणि तिच्या आईची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवर ऐकल्यानंतर न्यायालयाने श्याम वारकड यास दोषी ठरवून 14 वर्षे सक्त मजुरी यांनी एक लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोकवली या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अभियोग्यता लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली यांना पैरवी  म्हणून गोविंद कदम आणि बाबुराव सोडगिरे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments