तुळजापूर ड्रग्ज विक्री प्रकरणातील आरोपींना पूजा विधीस बंदी जिल्हाधिकाऱ्यांचा पुजाऱ्यांना दणका
धाराशिव : सध्या राज्यभर गाजत असलेला तुळजापूर येथील ड्रग्सचा मुद्दा चालु असतानाच येथील ड्रग्स प्रकरणी मंदिर संस्थांनी कठोर भूमिका घेतली आहे. या ड्रग्स प्रकरणात आरोपी म्हणून ज्यांचा समावेश दिसून आलेला आहे अशा पुजाऱ्यांना न्यायालयीन निर्दोषत्व प्राप्त होईपर्यंत मंदिरातील पूजा विधी करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा.श्री.. तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सांगितली मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची पुनर्रचना शासन आणि पुरातत्त्व विभागाच्या सूचनानुसार करण्याचा निर्णय केल्याची ही माहिती श्री पुजार यांनी दिली. धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पुजार यांनी मासिक पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांची माहिती दिली श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांची मंगळवारी दिनांक 22 रोजी तुळजापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्याची पुनर्रचना हा राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या सूचना आणि सल्ल्यानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री पुजारी यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री शिरीष यादव निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष आदी उपस्थित होते
न्यायालयात निर्दोषतत्व सिद्ध होत नाही तोवर राहणार बंदी कायम
या बैठकीमध्ये पोलीस प्रशासन पुजारी मंडळ नागरिक यांनी दिलेल्या विविध निवेदने मागणी यांची गंभीर दाखल घेऊन ड्रग्स प्रकरणात जे पुजारी किंवा व्यक्ती आरोपी असतील त्यांना न्यायालयातील निर्दोष तत्व जाहीर होईपर्यंत श्री तुळजाभवानी देवीची पूजा विधी करण्यास मनाई बंदी करण्याचा मंदिर संस्थाने निर्णय घेतल्याचे पुजार यांनी सांगितले.
0 Comments