जळगाव :प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्याने केली मुलीची गोळ्या झाडून हत्या; सैराटची पुनरावृत्ती
जळगाव: मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग तब्बल दोन वर्षानंतर ही मनात ठेवल्याने शनिवारी चोपडा येथे एका हळदी समारंभाच्या वेळी हत्याकांड घडले. ऑनर किलिंग मध्ये ठार झालेली तृप्ती अविनाश वाघ वय 24 ही पुण्यात एमबीबीएस चे शिक्षण घेत होती तर तिचा पती अविनाश हा एका कंपनीत नोकरीस होता. विवाहपूर्वीच त्या दोन कुटुंबामध्ये वैर आणि त्यातच कमी शिकलेल्या मुलासोबत प्रेम विवाह केल्याची सल तर तिच्या वडिलांच्या मनात होती याच कारणावरून चोपडा येथे सैराटची पुनरावृत्ती झाल्याची माहित पोलिसाच्या तपासात समोर येत आहे .या घटनेमुळे लगीन घरात घुमणाऱ्या सनईच्या सुराचा आक्रोशात रूपांतर झाल्याने वाघ कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेचे अधिक माहिती अशी की चोपडा येथे मयत तृप्तीची नंणदेची विवाह असल्याने ते आले होते वाघ कुटुंबीय हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. यावेळी मुलींनी प्रेमविवाह केल्याच्या रागातून सीआरपी मधील सेवानिवृत्त अधिकारी किरण मंगले यांनी त्यांच्या जवळील पिस्तूल मुलगी तृप्ती व जावई अविनाश वाघ यांच्यावर गोळ्या झाडल्या यामध्ये तृप्ती अविनाश वाघ वय 24 तिचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वाघ वय 28 राहणार कोथरुड पुणे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले असून त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत या प्रकरणी अविनाशची आई प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून किरण मंगले व मुलगा निखिल किरण मंगले जिधुळ तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी तपास शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तपास करत आहेत.
रुग्णालयातून निघाली अंतयात्रा
मयत तृप्तीच्या नंणदेच्या विवाहासाठी वाघ कुटुंबीय चोपडा येथे आली होती परंतु या ठिकाणी वडिलांकडून तिला ठार मारल्याची घटना समजतात सुन्न करणारी घटना घडली सोमवारी सकाळी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह थेट रुग्णालयातून समशानभूमीत आणण्यात आला या ठिकाणी अत्यंत शोकाकुल आणि पोलीस बंदोबस्तात तृप्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतप्त जमवाकडून मंगले यांना चोप
मयत तृप्ती हिची नंणद संस्कृती वाघ हिचा विवाह चोपडा येथील आंबेडकर नगरात राहणारे प्रदीप गणेश वाडे यांच्यासोबत ठरले होते त्याकरता तृप्ती नातेवाईकासोबत चोपडा येथे आली होती ही बाब तिचे वडिलांना समजल्यानंतर ते हळदीचा कार्यक्रमात आले त्यांनी हळदीच्या कार्यक्रमात नाचत असलेल्या मुलगी तृप्ती जावई अविनाश वाघ यांच्यावर स्वतः जवळील पिस्तुली मधून गोळ्या झाडल्या यामध्ये तृप्तीचा जागेच मृत्यू झाला तर अविनाश हा गंभीर जखमी झाला होता यावेळी संतप्त जमावाकडून किरण मंगले यांना चोप दिला यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments