तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात रविवारी दि (२७)रोजी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी ३ वाजेनंतर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यामध्ये प्रामुख्याने आंबा पिकांना फटका बसला आहे.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलीय. एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा चाळीशी पार करत असल्यानं नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांना थोडासा उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
उष्णतेपासून दिलासादायक
उन्हाळा सुरू झाला आहे, सूर्य चांगलाच तळपत आहे. प्रचंड उष्णता वाढली आहे. तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना काही काळ का होत नाही, उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.
0 Comments