धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय मजदूर काँग्रेस(इंटक) पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे रामधन जमाले यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्याचे नियुक्ती पत्राचे वितरण
धाराशिव (प्रतिनिधी) राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.कैलास भाऊ कदम, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण मराठवाडा प्रभारी रामधन जमा ले यांच्या आदेशावर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह दि.29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये संघटित व क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते यांची राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक धाराशिव जिल्ह्याच्या पदाधिकार्यांची निवड करुन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतांना काँग्रेस-इंटक धाराशिव जिल्हाध्यक्ष (इंटक) संघटने विषयी सविस्तर माहिती देतांना ते म्हणाले, संघटीत, असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटक सदैव तत्पर असते. कामगारांनी आपल्या अडीअडचणी, समस्या सोडवून घेण्यासाठी इंटकमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करुन इंटक संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र मजदूर कांग्रेस (इंटक) धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकारिणीची निवड करण्या साठी. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले व सखाराम बेगंडे सचिव काँग्रेसचे जनसेवक अमोल कुतवळ धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके मान्यवरच्या उपस्थितीमध्ये धाराशिव जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक धाराशिव जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
धाराशिव जिल्हा काँग्रेस (इंटक) कार्यकारिणी पुढील प्रमाणे - धाराशिव जिल्हा महिला कामगार अध्यक्ष- पुनम कदम जिल्हा उपाध्यक्ष-रोहित वसंतराव लगाडे उपाध्यक्ष-विकास उत्तम हावळे सचिव- किरण माणिकबाव यादव सहसचिव निरंजन मुरलीधर हटकर कोषाध्यक्ष- विजय मोहनराव शिंदे संघटक-विकास भागवत घोडके युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत चंद्रकांत इंगळे सोशल मिडीया प्रमुख- संजय सुखदेव गायकवाड सदस्य-रोहित संजय शेंडगे सदस्य-सव्यहार नारायण चव्हाण सदस्य-शुभम कमलचंद कदम सदस्थ-हरिष सुरवसे सदस्य-अनिल दगडु शिंदे सदस्य-आकाश गोरोबा चव्हाण तुळजापूर तालुक्यातील कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
तुळजापूर तालुका सचिव सुहास कानडे कृष्णा रोहिदास लोंढे तालुका संघटक ,ज्योतीराम देविदास माळी अध्यक्ष तुळजापूर तालुका पांडुरंग जगन्नाथ चव्हाण तुळजापूर तालुका सहसचिव जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुखांची व इतर निवडीचे पत्र पुढील बैठकीत देण्यात येणार आहे. आदी पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमा अनुमोदन विकास घोडके यांनी केले कार्यक्रमाचे आभार सुहास कानडे यांनी मानले उपस्थित काँग्रेसचे नरेश पेंदे सचिन जाधव युवराज पवार इंटक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments