उमरगा तालुक्यातील बोरी येथे विज पडून तरुण शेतकरी ठार
नाईचाकुर प्रतिनिधी : शेतात जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेवलेली हरभऱ्याची गुळी पावसाने भिजू नये यासाठी ताडपत्री झाकत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने तरुण शेतकरी जागेच ठार झाला ही घटना उमरगा तालुक्यातील बोरी गावात शुक्रवारी दिनांक 25 रोजी घडली दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी घडली.
या घटनेचे अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यामध्ये शुक्रवारी दिनांक २५ रोजी दुपारी चार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये तालुक्यातील बोरी गावातील तरुण शेतकरी अमोल संतराम मदने हे आपल्या जनावरांना चाऱ्यासाठी शेतातील हरभऱ्याची गुळी झाकत असताना त्यांच्यावर विजेचा प्रकोप झाला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अमोल मदने यांच्या पश्चात एक मुलगी मुलगा पत्नी वडील असा परिवार आहे अमोल मदने हे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांचे कुटुंब शेतीवरच अवलंबून आहे शासनाने अमोल मदने यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ मधून होत आहे. तर अमोल मदने यांचा पार्थिव पंचनामा करून उमरगा येथे शवविच्छनासाठी पाठवण्यात आला व त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments