बिबट्याच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दबा धरून बसलेल्या बिबट्याची तरुणीवर झडप, बापाच्या समोरच लेकीचा अंत
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात गवत कापण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पायल राजेंद्र चव्हाण असे मृत युवतीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-कळवण रस्त्यावर वाघाड कालव्यालगत राहणाऱ्या राजेंद्र चव्हाण यांची मुलगी पायल सायंकाळी जनावरांसाठी घास कापण्यासाठी गेली होती. यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. नातेवाइकांनी तातडीने धाव घेत आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी वन विभागावर रोष व्यक्त केला. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते. तसेच या परिसरात वारंवार जनावरांवर हल्ले होत आहेत मात्र वन विभाग उपायोजना करायचं नाव घेत नाही त्यामुळे वन विभागाला आता तरी जाग येणार का? असा संतप्त नागरिकातून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी गुराखी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. मात्र, वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. पायल ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतात आधीपासूनच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागून येऊन पायलवर झडप घातली बिबट्याने शिवारातच तिला ओढत नेत असताना मुलीच्या किंकाळ्या ऐकू आल्याने तिच्या वडिलांनी आणि आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठमोठ्याने आरडाओरड झाल्याने बिबट्याने पायलला तसेच सोडून पळ काढला. रक्ताने माखलेल्या पायलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु खासगी रुग्णालयात उपचार करण्यास मिळाल्याने नातेवाईकांनी तिला दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
0 Comments