बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू डॉक्टर व नर्सचा हलगर्जीपणा नातेवाईकांचा गंभीर आरोप, घटनेनंतर नातेवाईक संतप्त कारवाईची मागणी
बीड : रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या मातेने गोंडस बाळाला जन्म दिला परंतु बाळाचा रडण्याचा पहिला आवाज कानी पडण्याआधीच व त्याचा चेहरा पाहण्याआधीच मातेने जगाचा निरोप घेतला ही घटना बीड जिल्हा रुग्णालयात दिनांक 13 एप्रिल रोजी च्या पहाटे तीन वाजता घडली. छाया गणेश पांचाळ वय (21) राहणार आंबील वडगाव तालुका बीड असे मयत पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे पती गणेश बाबुराव पांचाळ यांनी गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती दरम्यान याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयास पोलीस चौकीत तक्रार दिल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 एप्रिल रोजी छाया गणेश पांचाळ यांना प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली होती. प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव वाढल्याने डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांनी तातडीने रक्त आणण्यास सांगितले यावेळी रुग्णालयातील रक्तपेढीत कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे रक्तासाठी महिला रुग्णाला ताटकळत राहावे लागले. त्यातच डॉक्टर व नर्सिंग स्टाफ ने त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरली महिलेची देखभाल करण्यासाठी नातेवाईकांकडून दोन हजार रुपये घेतले असल्याचा आरोप होत असून डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे छाया यांचा मृत्यू झाला असा आरोप गणेश पांचाळ यांनी केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करणार यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय घडला प्रकार?
प्रस्तुतीनंतर आपल्याला मुलगा झाल्याचा आनंद छाया यांचा चेहऱ्यावर दिसत होता तिने बिस्कीटही खाली परंतु काही वेळाने तिला रक्तस्त्राव सुरू झाला ही बाब तीच्या आईने तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तेथील एका परिचारकिनी मी घरी जाते तुम्हीच उपचार करा असे उद्घाटपणे म्हटले. मुलीच्या त्रासाची व्यथा मांडणाऱ्या आईचे कोणी ऐकले नाही कोणीही हालचाल केली नाही असे मयताच्या आईने सांगितले मदतीच्या आशाने छायाचा जीव कासावीस होत होता. एका तासातच तिने प्राण सोडले संबंधित डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे छायाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मुलाला काचेतून आईचे स्वप्न बघावे लागणार
डॉक्टराने मुलगा झाल्याचे सांगितल्यानंतर छायाच्या पतीने आणि नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मिठाईसाठी दिले परंतु मिठाईचा गोडवा काही तासात दुःखात बदलला नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे.
चौकशीसाठी समिती
नातेवाईकांच्या मागणीप्रमाणे डॉक्टरांची टीम तयार केली आहे त्यांच्या उपस्थितीत सेवाविच्छेदन होणार आहे त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल यात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच पैसे मागितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे त्याचाही चौकशी केली जाणार आहे..
डॉक्टर संजय राऊत जिल्हा शल्य चिकित्सक
बहिणीला रक्तस्राव सुरू झाला आईने तेथील नर्सला सांगितले असताना रक्तपेशी आणण्यासाठी आईला पाठवले आई रक्ताची पिशवी आणण्यासाठी बाहेर गेली आईने दरवाजा वाजवला परंतु डॉक्टर उठले नाही रक्त घेऊन येईपर्यंत बहिणीचा मृत्यू झाला निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा
आकाश कळसकर भाऊ
0 Comments